स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्मृतीस अभिवादन
भास्कर हा सूरांचा ज्यास नाही अस्त
जादू सूरांची भारावले रसिक समस्त
पिढ्यांमागूनी पिढी, लोकप्रियता ही अफाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
जगाच्या पाठीवर झाला दुर्गम प्रवास
नितीमूल्यांचा परी न झाला र्हास
विचारांइतकेच उच्चार ही सुस्पष्ट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
कणा पाठीचा ताठ ,ताठ तशीच मान
प्रखर राष्ट्रभक्ती निसर्गाची धर्माभिमान
गजेंद्र हा सूरांचा असे हिंदूत्वमत्त
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
आले देवाजीचे मनी जुळून आली त्रिवेणी
किमया केली राजा, राम गजाननानी
भाग्ये भारले चित्रसृष्टीचे ललाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
दरबारी सूरांच्या किती रत्ने प्रगटली
लता आशा माणिके भोवताली
चारित्र्यास परी कधी न लागले गालबोट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
गीतांमधली कविता फुलविली
ज्यातून भावगीते जन्मली
स्पष्ट उच्चारे नेमक्या सूरांनी सजविली
असे हा भावगीतांचा अनभिषिक्त सम्राट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
शब्दांनी सूरांना तोलणे,
सूरांनी स्वरांचा तोलणे ,
रसिकांना चिंब भिजवणे
सर्जनता ही ज्यांची आहे अफाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
वाल्मिकींच्या प्राकृताचे चांदणे झाले मराठी
रामकृपाच की घडल्या शब्दसूरांच्या गाठी
किर्ती त्याची पसरली सुदिगंत
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
सखी प्रिया सहचारिणी
म्हणे मी तर प्रेमदिवाणी
अशीच आणखी सूरेल गाणी
परी थांबली जाहली सावली
सुखदुःखात मिळे तिची नित्य साथ
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
सूरांचा हा अधिपती
राग फिरती फेर धरूनी भोवती
करतात विनंती
आम्हांस घेउनी करावी निर्मीती
अजरामर ही गाणी गोडी ज्यांची अवीट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
नंदिनी पित्रे
भास्कर हा सूरांचा ज्यास नाही अस्त
जादू सूरांची भारावले रसिक समस्त
पिढ्यांमागूनी पिढी, लोकप्रियता ही अफाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
जगाच्या पाठीवर झाला दुर्गम प्रवास
नितीमूल्यांचा परी न झाला र्हास
विचारांइतकेच उच्चार ही सुस्पष्ट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
कणा पाठीचा ताठ ,ताठ तशीच मान
प्रखर राष्ट्रभक्ती निसर्गाची धर्माभिमान
गजेंद्र हा सूरांचा असे हिंदूत्वमत्त
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
आले देवाजीचे मनी जुळून आली त्रिवेणी
किमया केली राजा, राम गजाननानी
भाग्ये भारले चित्रसृष्टीचे ललाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
दरबारी सूरांच्या किती रत्ने प्रगटली
लता आशा माणिके भोवताली
चारित्र्यास परी कधी न लागले गालबोट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
गीतांमधली कविता फुलविली
ज्यातून भावगीते जन्मली
स्पष्ट उच्चारे नेमक्या सूरांनी सजविली
असे हा भावगीतांचा अनभिषिक्त सम्राट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
शब्दांनी सूरांना तोलणे,
सूरांनी स्वरांचा तोलणे ,
रसिकांना चिंब भिजवणे
सर्जनता ही ज्यांची आहे अफाट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
वाल्मिकींच्या प्राकृताचे चांदणे झाले मराठी
रामकृपाच की घडल्या शब्दसूरांच्या गाठी
किर्ती त्याची पसरली सुदिगंत
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
सखी प्रिया सहचारिणी
म्हणे मी तर प्रेमदिवाणी
अशीच आणखी सूरेल गाणी
परी थांबली जाहली सावली
सुखदुःखात मिळे तिची नित्य साथ
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
सूरांचा हा अधिपती
राग फिरती फेर धरूनी भोवती
करतात विनंती
आम्हांस घेउनी करावी निर्मीती
अजरामर ही गाणी गोडी ज्यांची अवीट
बाबूजींच्या सूरांनी रोज होवो पहाट
नंदिनी पित्रे